पुण्यातील कोयता गँगविरोधात खासदार अमोल कोल्हे मैदानात; थेट गृहमंत्र्यांना लिहलं पत्र
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील हडपसर परिसरातील कोयता गॅंग सक्रिय होत असून या गँगने परिसरात दहशत निर्माण केली आहे. या गँग विरोधात कारवाई करण्यासाठी थेट खासदार अमोल कोल्हे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
हडपसर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँग सक्रिय होत असून परिसरात तोडफोड, गाड्यांची तोडफोड, मार्केटमध्ये दहशत निर्माण करणे असे काम ही गँग करत आहे.
https://twitter.com/Topnewsmarathi/status/1602983643852378113?t=-xAXmZ__VheeUX50bu9bbg&s=19
दरम्यान या कोयता गँग विरोधात मांजरी आणि हडपसर परिसरातील नागरिकांनीही काढला होता हडपसर पोलीस स्टेशनवर काही दिवसांपूर्वी मोर्चा देखील काढला होता. आता अमोल कोल्हे यांनी पत्र लिहिल्यानंतर पोलीस प्रशासनांकडून कोयता गॅंग वर कारवाई केली जाणार का? हेच पाहणं महत्त्वाचं असेल
