पुण्यातील चॉईस उद्योग समूहावर आयकर विभागाची छापेमारी

299 0

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळपासून पुण्यातील एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकासह त्याच्याशी संबंधित विविध व्यावसायिक कंपन्यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यास सुरुवात केली.

पुण्यात आयकर विभागाची मोठी छापेमारी करण्यात आली असून, चॉईस उद्योग समूहाच्या  विभागावर मोठी छापेमारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्याकडून सुरू आहे. दिल नामांकित चॉईस ग्रुप हा बांधकाम व्यवसायामध्ये एक महत्त्वाचा उद्योग समूह आहे.

पुण्यातील अनेक भागांमध्ये ज्या भागात प्राईम लोकेशन आहेत, तेथे या ग्रुपचे बांधकाम प्रोजेक्ट सुरू आहेत आणि या ग्रुपचे प्रमुख अशोक अग्रवाल हे आहेत. त्यांच्यावरच पुण्यात आज पहाटेपासूनच आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!