सकाळी उठलं की भोंगा सुरू होतो; नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदेंची पुण्यातील मेळाव्यात खासदार संजय राऊतांवर टीका

218 0

पुणे: सकाळी उठलं की भुंगा सुरू होतो आणि गद्दार आणि खोके याशिवाय दुसरा काही बोलतच नाही अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता निशाणा साधला ते पुण्यात झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या जाहीर मेळाव्यात बोलत होते.

राज्यात अभूतपूर्व सत्ता नाट्य घडल्यानंतर आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच बाळासाहेबांची शिवसेना गटाचा जाहीर मेळावा पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदे गटाचे मुख्य प्रतोद आणि आमदार भरत गोगावले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले आपल्या सरकारनं सत्तेत आल्यानंतर लगेच पेट्रोल डिझेल वरील कर कमी करण्याचं काम केलं सर्वसामान्य जनतेसाठी ‘वर्षा’ बंगल्याची दारं 24 तास एकनाथ शिंदे यांनी खुली केली – श्रीकांत शिंदे शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी करणारे एकनाथ शिंदे हे राज्याच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री आहेत.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलं असून पोलिसांना 15 लाखांत घरं देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारनं घेतला असं देखील शिंदे म्हणाले

पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात ‘लाईट & शो’ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असून  रिंग रोड पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं शिंदे यांनी सांगितलं

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!