पीएमपीएमएल प्रवाशांसाठी खुशखबर! आता बसमध्ये सुरु होणार गुगल पे सेवा

245 0

पीएमपीएमएल बसमध्ये नेहमी सुट्या पैशांवरून कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद आता कमी होणार आहेत. त्याचं कारण म्हणजे पीएमपीच्या ताफ्यातील सर्व बसमध्ये येत्या मंगळवारपासून ‘गुगल पे’ची सेवा सुरू करण्यात येणार आहे.

पीएमपीएमएलकडून करण्यात आलेली प्रायोगिक तत्त्वावरील चाचणी नुकतीच पूर्ण झाल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आपल्याला नेहमीच पीएमपी कंडक्टर आणि प्रवाशी यांच्यात सुट्या पैशांवरून वाद होत असल्याचे कानी पडते.हे वाद थांबवण्यासाठी पीएमपी प्रशासनाने ऑनलाईन असलेली ‘गुगल पे’ सेवा सुरू करण्याचं नियोजन केलं होतं. त्यानुसार सुरूवातीला पीएमपीएमएल प्रशासनाने ‘पुणे दर्शन’ बससेवेत ही प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतली. ती चाचणी आता यशस्वी झाली आहे. त्यामुळे नियमित तिकिटाच्या यंत्रणेसोबतच प्रवाशांना ‘गुगल पे’ सेवासुद्धा उपलब्ध होणार आहे. पीएमपीएमएल सर्व बसेसमध्ये ‘क्युआर कोड’ लावण्याचे काम सुरू असून, ताफ्यातील सर्व बसमध्ये हा ‘क्युआर’ कोड बसवण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!