Breaking News

उध्दव ठाकरेंची तोफ आज बुलढाण्यात धडाडणार; शेतकरी मेळाव्याला करणार संबोधित

251 0

बुलढाणा: शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज शनिवारी (ता.26 नोव्हेंबर) बुलढाण्यात धडाडणार आहे बुलढाण्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार असून त्यांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भातील जिल्ह्यात येतायत. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

बुलढाणा हा विदर्भातील शिवसेनेचा सर्वात मोठा गड म्हणून ओळखला जातोय.. मात्र याच जिल्ह्यातील दोन आमदार व खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱयांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. उद्या होणाऱ्या ठाकरेंच्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलीय

Share This News
error: Content is protected !!