नव्या प्रभाग रचनेमध्ये तोडफोड झाल्यास अनेक विद्यमान नगरसेवकांना बसणार फटका

204 0

पुणे- आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांचा समावेश आणि अस्तित्वातील चार सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये झालेले बदल आता प्रस्थापित नगरसेवकांसाठी डोकेदुखी बनणार आहे. आपलं नगरसेवकपद शाबूत ठेवण्यासाठी आता या नगरसेवकांना पक्षांतर करणे, प्रभाग बदलणे किंवा निवडणूक न लढवणे या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.

पुणे महापालिकेने ५७ त्रिसदस्यीय आणि एक द्विसदस्यीय अशा एकूण ५८ प्रभागांची यादी जाहीर केली. यामध्ये प्रभागाच्या हद्दीची चतु : सीमा, नकाशे आणि प्रभागांच्या नावांचा समावेश आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये ३४ गावांचा समावेश करण्यात आल्यामुळे महापालिकेची हद्दवाढ झाली आहे. मतदारांची संख्या देखील वाढली आहे.

मागील निवडणुकीत पुणे महापालिकेमध्ये भाजप- रिपाइं आघाडीचे ९९ नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये बहुतेक प्रभागात चारही नगरसेवक भाजपचेच आहेत केवळ दोन प्रभागांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ( NCP ) चार नगरसेवक आहेत. त्यामुळे नव्या रचनेत प्रभागांची तोडफोड झाल्याचा सर्वाधिक फटका भाजप नगरसेवकांनाच बसणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेने महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्रितपणे महापालिकेच्या निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे.

सध्या पुणे महापालिकेत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेसचे प्रत्येकी दहा नगरसेवक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास महाविकास आघाडीतील विद्यमान नगरसेवकांना कोणताही धोका नाही. मात्र इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास पक्षांतर किंवा बंडखोरी होण्याची जास्त शक्यता आहे.

पुणे महापालिकेच्या नवीन प्रभागांची नावं, आरक्षण व मतदार संख्या (कंसात)

एकूण जागा : 173 एकूण प्रभाग : 58
द्विसदस्यीय प्रभाग : (01) (क्र. 13 – बाणेर सुस म्हाळुंगे)
त्रिसदस्यीय प्रभाग : ( उर्वरित 57)

1. धानोरी – विश्रांतवाडी : SC/ST (55488)

2. टिंगरेनगर – संजय पार्क (56969)

3. लोहगाव – विमाननगर : SC (61836)

4. वाघोली – इऑन आयटी पार्क : SC (58912)

5. खराडी – चंदननगर (67367)

6. वडगावशेरी ( 60110)

7. कल्याणीनगर – नागपूर चाळ : SC (67739)

8. कळस – फुलेनगर : SC (62273)

9. येरवडा : SC (71390)

10. शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी : SC (62481)

11. बोपोडी – पुणे विद्यापीठ : SC (57861)

12. औंध – बालेवाडी : SC (62050)

13. बाणेर – सुस म्हाळुंगे (37589)

14. पाषाण – बावधन बुद्रुक : ST (58515)

15. पंचवटी – गोखलेनगर (67821)

16. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे (67103)

17. शनिवार पेठ – राजेंद्रनगर (67951)

18. शनिवार वाडा – कसबा पेठ (67701)

19. रास्तापेठ – के. ई. एम. हॉस्पिटल : SC (58994)

20. पुणे स्टेशन – ताडीवाला रोड : SC (67129)

21. मुंढवा – घोरपडी SC (67574)

22. मांजरी – शेवाळवाडी : SC (61878)

23. साडेसतरानळी – आकाशवाणी (55659)

24. मगरपट्टा – साधना विद्यालय (56446)

25. हडपसर गावठाण – सातववाडी (55782)

26. भीमनगर – रामटेकडी : SC (67721)

27. कासेवाडी – हरकानगर : SC (68501)

28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट (57483)

29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई (67592)

30. जयभवानी नगर – केळेवाडी (60237)

31. कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर (61115)

32. भुसारी कॉलनी – सुतारदरा (67127)

33. बावधन खुर्द – महात्मा सोसायटी (66218)

34. वारजे – कोंढवे धावडे (64919)

35. रामनगर – उत्तमनगर शिवणे (67422)

36. कर्वेनगर (67260)

37. जनता वसाहत – दत्तवाडी (67332)

38. शिवदर्शन – पद्मावती : SC (66561)

39. मार्केटयार्ड – महर्षी नगर : SC (59580)

40. गंगाधाम – सॅलीसबरी पार्क : SC (59882)

41. कोंढवा खुर्द – मिठानगर (55825)

42. सय्यदनगर – लुल्लानगर (54026)

43. वानवडी – कौसरबाग (59414)

44. काळेपडळ – ससाणेनगर (55287)

45. फुरसुंगी (55957)

46. मोहम्मदवाडी – उरुळी देवाची : SC (55047)

47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी (55662)

48. अप्पर सुपर इंदिरानगर : SC (56884)

49. बालाजीनगर – के. के. मार्केट (58027)

50. सहकारनगर – तळजाई : SC (62390)

51. वडगाव – पाचगाव पर्वती (67289)

52. नांदेड सिटी – सनसिटी (66626)

53. खडकवासला – नऱ्हे (63525)

54. धायरी – आंबेगाव (58447)

55. धनकवडी – आंबेगाव पठार (57719)

56. चैतन्यनगर – भारती विद्यापीठ (56327)

57. सुखसागर नगर – राजीव गांधी नगर (55971)

58. कात्रज – गोकुळनगर (57847)

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!