पुण्याच्या नवले पुलावरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

217 0

पुणे: पुणे येथे नवले ब्रिजवर आज रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे.

हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील शिंदे यांनी दिले आहेत

 

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide