पुणे: भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा मृत्यू

176 0

रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावर  केळावडे गावच्या हद्दीत एका कंपनीसमोर गुरुवारी सायंकाळी झाला.

अशोक नामदेव भांडवलकर (वय-55 रा. केळावडे, ता. भोर) असे मृत्यू झालेल्या पोस्टमनचे नाव आहे. तर सिद्धार्थ राजेश देशमुख (वय-21 रा. आनंदनगर, वडगाव बुद्रुक) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धार्थवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षय रमेश भांडवलकर यांनी फिर्याद दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!