पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा खिंडार! इरफान सय्यद एक हजार कार्यकर्त्यांसह करणार शिंदे गटात प्रवेश

241 0

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असल्याचं दिसून येत आहे. भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान सय्यद यांच्यासह 1000 हजार कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर इरफान सय्यद यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. इरफान सय्यद हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मोठे कामगार नेते आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!