सुषमा अंधारे यांचे पती करणार शिंदे गटात प्रवेश; त्या मंत्र्यांच्या उपस्थितीत आज करणार पक्षप्रवेश

293 0

मुंबई: सुषमा अंधारे यांना बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटानं मोठा झटका दिला आहे. त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. सुषमा अंधारे यांना झटका देत शिंदे गटात वाघमारे यांना मोठे पदही दिले जाणार असल्याची माहिती आहे.

वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचं कारणही स्पष्ट केलं. आजचा आनंदाचा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. त्यामुळे मी त्यांच्या प्रेमात पडलो.

त्यामुळेच मी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. रामदास कदम, गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रवेश होत असल्याचं वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं.

Share This News
error: Content is protected !!