निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूनं चर्चा करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

159 0

निवडणुकांमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम होत असतो. चर्चांवर त्याचा परिणाम होत असतो हे खरं असलं तरी निवडणूक येतात आणि जातात. अर्थसंकल्प 2022 हा आपल्या वर्षभराचा लेखाजोखा असतो. त्यामुळे सर्व खासदारांनी संसदेत चर्चेत सहभागी व्हावे. चांगल्या हेतूनं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना केलं.

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे.
या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधानांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे बजेट सत्र जगात फक्त भारताची आर्थिक प्रगती, भारतातील लसीकरण मोहीम, भारताने स्वत: तयार केलेली लस आदींबाबत संपूर्ण जगात विश्वास निर्माण करत आहे. या सत्रात खासदारांनी मांडलेलं त्यांचं म्हणणं, त्यांच्या चर्चाचे मुद्दे, मोकळ्या मनाने करण्यात आलेली चर्चा आदी गोष्टी वैश्विक प्रभावाची संधी होऊ शकते, असं मोदी म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide