उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! गजानन कीर्तिकर शिंदे गटात

610 0

मुंबई: शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर अखेर शिंदे गटात दाखल होणार असून यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र पाहायला मिळतात शिंदे गटात अर्थात बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल होणारे किर्तीकर हे तेरावे खासदार असणार आहेत.

गजानन किर्तीकर हे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार आहेत. राहुल शेवाळे यांच्यानंतर आता गजानन किर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणारे मुंबईचे दुसरे खासदार आहेत. गजानन किर्तीकर हे मुंबई उत्तर पश्चिमचे लागोपाठ दोनवेळचे खासदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा गटनेते राहुल शेवाळे आणि गजानन किर्तीकर हे एकाच कारमधून मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरला जाण्यासाठी निघाले.

मागील अनेक दिवसांपासून किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करतील अशा चर्चा होत्या मात्र आज अखेर ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत

Share This News
error: Content is protected !!