अखेर सात दिवसांनी आमदार कैलास पाटील यांचं उपोषण मागे

139 0

गेल्या सात दिवसांपासून आमदार कैलास पाटील यांनी सुरु केलेले उपोषण तात्पुरत्या स्वरुपात मागे घेतले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांची भेट घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केलं आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उस्मानाबादचे आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील मागील सात दिवसापासून पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. सहा- सात दिवसांनंतर अखेर आज कैलास पाटील यांच्या आंदोलनाचा मुजोर पिक विमा कंपनीला दणका बसला आहे.

Share This News
error: Content is protected !!