पुण्यातील स्टार्टअप नवउद्योजकांचा विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाकडून सत्कार

343 0

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाकडून पुण्यातील राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आलेल्या स्टार्टअप सुरू करणाऱ्या पाच नवउद्योजकांचा सत्कार करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ मध्ये आयोजित या सत्कार कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी सर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, इनोव्हेशन केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रसेनजीत फडणवीस, डॉ. संजय चाकणे, माजी विद्यार्थी संपर्क प्रमुख प्रतिक दामा आदी यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच देशातील जवळपास 50 स्टार्टअपना गौरवण्यात आले. यामध्ये पुण्यातील अत्रेय इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​डॉ.अनिरुद्ध जोशी, रेपोज आयओटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​चेतन आणि अदिती वाळुंज, पिव्होट चेन सोल्युशन्स टेक्नॉलॉजीचे दीपक राव, अप कर्व्ह बिझिनेस सर्व्हिसेस लिमिटेडचे रवी कुमार आणि वेसाटोगो इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अक्षय दीक्षित यांचाही समावेश होता. विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभाग व एसपीपीयू अल्युमिनाय असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Share This News
error: Content is protected !!