चलनी नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावा; भाजप आमदाराची मागणी

200 0

नोटांवर गांधींजींच्या फोटोसह लक्ष्मी आणि विघ्नहर्त्या गणेशाचा फोटोही असावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. 

यानंतर आता भाजपचे राम कदम यांनी ट्विट करत मोदी आणि सावरकर यांच्या फोटोची मागणी केली आहे.

राम कदम यांनी ट्विट करत नोटांचे चार फोटो शेअर केले आहेत. एका फोटोवर छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या फोटोवर बाबासाहेब आंबेडकर, तिसऱ्या फोटोवर सावरकर तर चौथ्या फोटोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी. अशा चार नोटांचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी ! अशी कॅप्शन दिली आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे.

Share This News
error: Content is protected !!