तब्बल दोन तासांनी व्हॉट्सॲप सेवा सुरळीत

299 0

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाले आहे. गेल्या अर्धा तासापासून जगभरातील अनेक भागात सर्व्हर डाऊन झाल्यानं मोठ्या तक्रारी युजर्सकडून केल्या जात होत्या.

अनेकजण मेसेजिंग, महत्त्वाच्या फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅप हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाला आहे. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याने कोट्यवधी युजर्सचा त्याचा फटका बसला आहे.

मागील वर्षी देखील फेसबुकच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने व्हॉट्सॲप ची सेवा ठप्प पडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा व्हॉट्सॲप डाऊन झाले होते.

अखेर ही व्हॉट्सॲप सेवा दोन तासानंतर पुन्हा सुरळीत करण्यात आले आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता बंद झालेल्या व्हाट्सअप पुन्हा दुपारी दोन वाजून चोवीस मिनिटांनी सुरू झालं

Share This News
error: Content is protected !!