उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर

139 0

मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेल्यानं ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे .

शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे उद्या रविवार (दि. 23 ऑक्टोबर) रोजी  दौऱ्यावर जाणार आहेत .

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार असल्याचं बोललं जात आहे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!