दुर्दैवी! पुण्यातील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

243 0

पुणे: पुणे शहरात आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली असून सदाशिव पेठ, भिकारदास मारुती जवळ एका हॉटेलमधे आगीची घटनेत एका 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. 

घटनेची माहिती अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी एकीकडे होजच्या साह्याने पाण्याचा मारा सुरू केला तर दुसरीकडे स्थानिकांच्या सांगण्यावरून तेथे पोटमाळ्यावर अडकलेल्या एका लहान मुलीला बाहेर काढण्यासाठी बी ए सेट घालून आतमधे प्रवेश करुन त्या मुलीची जखमी अवस्थेत पाच मिनिटात सुटका करुन तातडीने दलाच्या देवदूत या वाहनामधून सुर्या हॉस्पिटल येथे रवाना केले.

तसेच इतर कोणी आतमधे अडकले आहे का याची खाञी करुन आग पुर्ण विझवली व तेथे आगीमधे असलेली काही रक्कम व दागिने सदर मुलीच्या आईच्या ताब्यात पोलिसांसमोर दिली अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी दिली.

सदर ठिकाणी हैद्राबाद बिर्यानी असे हॉटेलचे नाव असून येथे कोळशाच्या सहा शेगडी व तीन सिलेंडर आहेत व गॅसगळती होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी काही प्रमाणात इलेक्ट्रिक शॉक लागत असल्याने महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तसेच सुर्या हॉस्पिटल येथील डॉक्टराच्या माहितीनुसार जखमी मुलगी ईरा नईम खान वय वर्ष ६ हिचा मृत्यू झाला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!