भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण ; मुख्य सेवक विनायक, ड्रायव्हर शरद आणि केअरटेकर पलक दोषी

750 0

इंदोर – आध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी इंदूर न्यायालयाने दोषी तिघांना प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सेवकांनी केलेल्या छळामुळेच भैय्यू महाराज यांनी आत्महत्या केली असे न्यायालयाने आदेश देताना म्हटले आहे.

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी 19 जानेवारीला साडेपाच तास सुनावणी झाली. यात भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा निकाल 28 जानेवारीला सुनावण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांचे सेवक विनायक, शरद आणि पलक बराच काळ तुरुंगात आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात दोन सत्रांत साडेपाच तास सुनावणी झाली.

निकाल देताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी म्हटले आहे की, आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असत. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले. भैय्यू महाराजांना कुटुंबापेक्षा सेवेकऱ्यांवर अधिक विश्वास होता की त्यांनी त्यांचे आश्रम आणि काम सेवकांकडे सोपवले होते, त्याच सेवेकऱ्यांनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.

आरोपी विनायकच्या वतीने अ‍ॅड. आशिष चौरे यांनी युक्तिवाद केला. यापूर्वी दोन आठवडे सरकारच्या वतीने शरद आणि विनायक यांच्यात अंतिम चर्चा झाली होती. महाराजांनी स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ट्रस्टची जबाबदारी विनायकवर सोपवण्यात आली होती, त्यांच्या नावावर संपत्ती नव्हती, असा युक्तिवाद विनायकच्या वकिलाने केला. त्यामुळेच त्याला गोवण्यात आले आहे. घटनेच्या काही दिवसांपूर्वी भय्यू महाराज पुण्याला जात होते. त्यांना वारंवार कोणाचे तरी फोन येत होते, त्याचाही पोलिसांनी योग्य तपास केला नाही, अन्यथा योग्य आरोपी सापडला असता, असेही वकिलांनी म्हटले. यापूर्वी शरदचे वकील धर्मेंद्र गुर्जर यांनी दोन दिवसांत 10 तास तर पलकचे वकील अविनाश सिरपूरकर यांनी पाच दिवस युक्तिवाद केला होता. या खटल्यात 30 हून अधिक साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide