पुण्यात मुसळधार पाऊस; कुठे घडल्या झाडपडीच्या घटना तर कुठे शिरले पाणी

256 0

पुणे: पुणे शहरात मागील दोन तासात बसून ढगफुटी सदृश पाऊस पडत असून या पावसामध्ये पुण्यातील रस्त्यांना अक्षरशः ओढ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागांसह शनिवार वाडा ते अगदी मार्केट यार्ड पर्यंतच्या परिसरात पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.

रात्री साडेअकरा पर्यंत अग्निशामन दलाला मिळालेल्या माहितीनुसार सात ठिकाणी पाणी शिरलं असून एक ठिकाणी मीटर बॉक्स शॉर्टसर्किटची घटना घडली असून पर्वती येथील रमणा गणपतीजवळ भिंतीचा भाग कोसळला आहे तर हडपसर आकाशवाणी या ठिकाणी झाडपडीची घटना घडली आहे

मीटर बॉक्स शॉर्टसर्किट – सोमवार पेठ

या ठिकाणी शिरलं पाणी

– येवलेवाडी स्मशानभूमीजवळ 

– सुखसागर नगर, अंबामाता मंदिर

– कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड

– रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ

– सुखसागर नगर, डॉल्फिन चौक

– बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर

– हडपसर, गाडीतळ

या ठिकाणी झाली झाडपडी 

– हडपसर, आकाशवाणीजवळ

Share This News
error: Content is protected !!