टीईटी परीक्षा घोटाळा; अपात्र ठरलेल्या तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे घेऊन केलं पास

573 0

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. 500 अपात्र विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 50-60 हजार रुपये घेतल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आले आहे.

प्रकरणाचा तपास करत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केला. सायबर पोलिसांनी परीक्षा परिषदेकडून मागवली जिल्ह्यानुसार टीईटीची परीक्षेची आकडेवारी मागवली आहे. परीक्षा परिषदेकडून आकडेवारी देण्यास टाळाटाळ करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. येत्या आठ दिवसात आकडेवारी न दिल्यास परिषदेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेपरीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या सुनील घोलपसह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे . घोलप याने 2020 मधील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्स अपवर पाठवित होता. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवित असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

या प्रकरणात वेगवेगळया ठिकाणाहून आतापर्यंत 40 आरोपीना अटक करण्यात आली आहे. यामधील काहीआरोपी यातील काही आरोपी हे म्हाडा, आरोग्य भरतीमध्येही सहभागी आहेत. सायबर पोलीसांच्या तपासात निष्पन्न सात हजार आठशे शिक्षक जर सेवेत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांना पदमुक्त केली जाईल.

2013 पासून टी ई टी परिक्षेत घोटाळा झाल्याचा संशय आहे. त्यामुळे राज्यभरातून शिक्षकांची सर्टीफिकेट पडताळणीसाठी मागविण्यात आली आहेत. आतापर्यंत 6 हजार सातशे सर्टीफिकेट जमा झालीयत. अजून नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर महापालिकेची आकडावारी यायची आहे. या सात हजार सातशे शिक्षकांपैकी जे शिक्षक बोगस पद्धतीने भरती झाले असतील त्यांना पदमुक्त केले जाईल आणि त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार आहे.

दरम्यान, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत मोठं घबाड जप्त केले. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून अटक केली आहे. त्यानंतर त्याच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता पोलिसांना मोठं घबाड आढळून आलं आहे. अश्विन कुमार याच्या घरातून 25 किलो चांदी आणि 2 किलो सोन जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या टीमने अश्विन कुमार याच्या बंगळुरू येथील घरी झाडाझडती केली असता हे घबाड सापडलं

टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले होते.

Share This News
error: Content is protected !!