SPECIAL REPORT: भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले राहुल लोणीकर कोण आहेत ? पाहा राजकीय कारकीर्द

348 0

नुकतीच भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची भाजपा प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्या जागी लोणीकर यांना संधी देण्यात आली आहे.

राहुल लोणीकर हे भाजपचे जालना जिल्ह्यातील परतुर मतदारसंघातील आमदार, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा मुलगा आहे. राहूल लोणीकर यांची कशी आहे राजकीय कारकीर्द पाहूयात…

कोण आहेत राहुल लोणीकर ?

माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री म्हणून केलं काम

जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक

जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष

मात्र राहुल लोणीकर यांची भाजयुमोच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानं ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजपावर विरोधी पक्षांकडून घराणेशाहीची टीका होताना दिसत आहेत.

Share This News
error: Content is protected !!