Murlidhar mohol

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

564 0

पुणे- राज्यासह पुणे शहरात देखील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढ होताना दिसून येत आहे. सामान्य नागरिकांपासून ते स्थानिक लोकप्रतिनिधी, बॉलिवूड स्टार्स, ते केंद्रीय मंत्र्यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. यातच आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः ट्विटरवरून माहिती दिली असून आपल्या ट्विटमध्ये मोहोळ म्हणतात, कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल.

Share This News
error: Content is protected !!