मविआच्या समन्वय समितीची आज बैठक, महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपावर होणार चर्चा ?

190 0

मुंबई- महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार असून या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपावर चर्चा होणार का याबाबत उत्सुकता आहे.

या बैठकीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमधील धुसपूस कमी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून कुचंबणा होत असल्याची तक्रार काँग्रेसकडून केली जात आहे. त्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बैठकीनंतर महाविकास आघाडीमधील नेत्यांची आगपाखड थांबणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

दरम्यान, काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत काँग्रेस नेत्यांची त्यांच्या खात्याच्या निधीवरून होणारी अडवणूक, पुढील निवडणूक या विषयावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!