ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

निवडणूक आयोगाने जेंव्हा धनुष्यबाण गोठवले  तेंव्हा उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले!

मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आज अखेर शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. 

धनुष्यबाण चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर आता राजकीय वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आलं असून आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

निवडणूक आयोगाने जेंव्हा धनुष्यबाण गोठवले
तेंव्हा उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले!
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव गोठवले
कारण उद्धव ठाकरेंनी महायुती च्या मागे लागून
एकनाथ शिंदेंना आमच्या कडे पाठवले ! असं रामदास आठवले यांनी आपल्या कवितेत म्हटलं आहे.