बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने आणि विचारांनी शिवसेना आणि धनुष्यबाण मोठा केला

312 0

नवी दिल्ली: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आज अखेर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. 

निवडणूक चिन्ह उठवल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिली प्रतिक्रिया आले असून मनसेचे प्रवक्ते आणि सचिव योगेश खैरे यांनी मा. बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने आणि विचारांनी शिवसेना आणि धनुष्यबाण मोठा केला…. पण विचारांपासून घेतलेली फारकत, अहंकार यामुळे ते सांभाळता आलं नाही हे दुर्दैवी आहे ! असं म्हटलं आहे.

संपलेल्या पक्षावर बोलत नाही असं जिव्हारी लागणारं तुच्छपणे बोलणाऱ्यांना पाच महिन्यातच नियतीचं उत्तर मिळालं ! असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेला टोला लगावला आहे

Share This News
error: Content is protected !!