शिवसेनेचा दसरा मेळावा ‘शिवतीर्था’वरच होणार; उद्धव ठाकरे यांचा विश्वास

292 0

नवी मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही,पण शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होतं मेळाव्या दरम्यान व्यासपीठावर संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची आरक्षित ठेवण्यात आली आहे. राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. 

याच मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना का दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचा ठाम निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर संजय राऊत हे लढवय्ये सैनिक असल्याचं म्हणत संजय राऊत यांचं कौतुक देखील उध्दव ठाकरे यांनी केलं

मुंबई हे देशाच आर्थिक केंद्र आणि आणि तेथून तुम्ही आर्थिक केंद्रच पळवता? वेदांतावरून धादांत खोट बोलता? कुणाशी भांडताय? आम्हीं येऊ तुमच्यासोबत, आणतो म्हणा, परत आणा. मिंधे गट म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, अशी टीका वेदांता प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील घडामोडी तुम्हांला माहित हव्यात. जनसंघ हा समिती फोडणारा, ही त्यांचीच औलाद आहे. पंचवीस वर्ष युतीत आमची सडली, कुजली. ही सगळी नालायक माणसं आपण जोपासली. विनासायास यांना उपमहापौर पद मिळालं… मेहनत करायची शिवसैनिकांनी. वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे… तुमचा वंश कुठला? सगळे बाहेरचे घेतले भरले आहेत… वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. तुमचा वंश कुठला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला आहे.

मुंबईवर लचके तोडणारी गिधाड, त्यांची औलाद फिरायला लागली आहे. शिवाजी महाराजांच्या काळात देखील आदिल शहा, हे शहा, ते शहा असे अनेक चाल करून आलेले… आताही त्या कुळातील येऊन गेले. अमित शाह म्हणाले, शिवसेनेला जमीनीवर आणू. तुम्हीं प्रयत्न कराच, तुम्हांला आम्हीं आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!