नवी दिल्ली: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पंजाब लोक काँग्रेस हा त्यांचा पक्षही भारतीय जनता पक्षात विलीन केला आहे.
पंजाब के पूर्व मुख्यमंत्री @capt_amarinder ने आज पंजाब लोक कांग्रेस पार्टी (PLC) का भाजपा में विलय कर पार्टी की सदस्यता ग्रहण की।
इस अवसर पर उन्होंने पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda और देश के गृह मंत्री श्री @AmitShah से पार्टी मुख्यालय में मुलाकात की। pic.twitter.com/POk1tFxmZg
— BJP (@BJP4India) September 19, 2022
केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, किरेन रिजिजू, भाजप नेते सुनील जाखड आणि भाजपच्या पंजाब प्रमुख अश्विनी शर्मा यांच्या उपस्थितीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माजी काँग्रेस सदस्य आणि पंजाब विधानसभेचे उपसभापती अजयबसिंग भाटी हे सुद्धा भाजपमध्ये दाखल झाले.
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या संघर्षामुळे काँग्रेस हायकमांडच्या विरोधात आघाडी उघडली होती. त्यावेळी, निवडणूक रणनीतीचा एक भाग म्हणून अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या अनेक जवळच्या मित्रांना भाजपमध्ये सामील करून घेतले होते, परंतु त्यांनी स्वत: त्यांच्या राजकीय पक्षाच्या बॅनरखाली भाजपशी युती करून निवडणूक लढवली.
Happy to share that @plcpunjab today merged with @BJP4India in the presence of Union ministers @AmitShah, @nstomar, @KirenRijiju and BJP national president @JPNadda Ji.
Will continue to work for the betterment of Punjab. Jai Hind! pic.twitter.com/H9Poy1Ggc3
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) September 19, 2022
अमरिंदर सिंग यांना त्यांची पटियालाची जागा वाचवता आली नाही किंवा त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार जिंकता आला नाही. आम आदमी पक्षाच्या झंझावातामध्ये भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी पाहता भाजपने आता राज्यातील संघटनेची पुनर्रचना सुरू केली असून अमरिंदर सिंग भाजपमध्ये सामील झाल्यामुळे पंजाबमध्ये पक्षाचा पाया वाढण्यास मदत होईल आणि पक्ष मजबूत होईल, असा विश्वास भाजपच्या रणनीतीकारांनी व्यक्त केला आहे. संघटना निर्माण करण्यास मदत करेल.