पुणे: पुणे शहरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून आज सकाळपासूनच संपूर्ण पुणे शहरात पावसाची संततधार सुरू असून पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणं 100% क्षमतेनं भरली आहेत.
पुण्यातील भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून अग्निशमन दलाकडे आज दिवसभरात पाऊसामुळे 10 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून सदर ठिकाणी दलाच्या अग्निशामक जवानांनी काम करत धोका दूर केला आहे. तर दोन ठिकाणी किरकोळ स्वरूपात शॉर्टसर्किटची घटना घडली होती. तसेच कोठे ही पाणी साचल्याची/पाणी शिरले अशी वर्दी दलाकडे नाही.
परंतू सकाळी मुंढवा जॅकवेल पुल या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने अग्निशमन दल दाखल होत सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी वाहतूकीस पूल बंद केला होता.
*या ठिकाणी घडल्या झाडपडीच्या घटना*
- सेनापती बापट रोड
- नगर रोड, सन फ्रान्सिस शाळा
- सासवड रोड, भोसले व्हिलेज
- वारजे स्मशानभूमी जवळ
- सिहंगड रोड, हॉटेल ब्रम्हा
- कोरेगांव पार्क
- मुळा रोड, एन्थनी चर्च
- औंध, परिहार चौक
- बाणेर, पॅनकार्ड क्लब रोड
- कर्वे रोड, नळस्टॉप चौक