Crime

रक्षकच बनला भक्षक ! औरंगाबादेत चक्क पोलीस कर्मच्याऱ्यानंच लुटलं व्यापाऱ्याला…

248 0

औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडून देणारी धक्कादायक घटना घडलीये. चक्क एका पोलीस कर्मचाऱ्यानं सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आलाय.

संतोष वाघ असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून, तो औरंगाबाद ग्रामीण पोलिसात सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. याप्रकरणी औरंगाबाद शहर हद्दीतील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संतोष वाघ यानं आपला मित्र रामचंद्र दहिवाळ याच्यासह सराफा व्यापाऱ्याला केंब्रिज चौकात अडवून पोलीस असल्याचं सांगत चौकशी करण्याच्या बहाण्यानं अडवलं आणि तब्बल 24 तोळे सोनं तसेच 8 लाख 40 हजार रुपये सराफा व्यापाऱ्याकडून लुटले. अशोक विसपुते, असं सराफा व्यापाऱ्याचं नाव आहे. सराफा व्यापाऱ्यानं पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संतोष वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यासह त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेतलं. गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!