गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत असणं एक विशेष अनुभव आहे – अमित शाह
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी लालबागच्या राजासह मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देखील भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांनी बैठक घेत आगामी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे.
याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मराठीमध्ये ट्विट करत मुंबई भेटीसंदर्भात सांगितले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे असं म्हटलं आहे.
गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे.
आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन.
शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल.
— Amit Shah (@AmitShah) September 5, 2022
