सायरस मिस्त्री यांच्या निधनानं देशानं कर्तबगार उद्योगपती गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

362 0

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे गाडी दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाला असून मिस्त्री यांच्या ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली आहे.

पालघर येथील चारोटी जवळ सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज गाडीचा भीषण अपघात झाला. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या असून टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला त्यांनी म्हटलं आहे.

सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अशा शब्दात शिंदे यांनी आपल्या शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!