दुसऱ्या महामुकाबल्यासाठी टीम इंडिया सज्ज; आज भारत, पाकिस्तान भिडणार

262 0

आशिया चषकात सलग दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव केला होता.

विश्‍व चषकाच्या अंतिम संघाच्या द‍ृष्टीने हा सराव सामना म्हणून बघितले पाहिजे. भारताची फलंदाजी ही चिंतेची बाब नाही. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कोहली, राहुल, पंड्या, पंत आणि दिनेश कार्तिक ही फळी सक्षम आहे, पण बुमराहच्या अनुपस्थितीत गोलंदाजी कमजोर वाटते. आवेश खानच्या विरुद्ध हाँगकाँगने धावा कुटल्या. मुळात भुवनेश्‍वर कुमार हा आपला प्रमुख गोलंदाज हेच आपली गोलंदाजीतली कमकुवकता दाखवते.

भुवनेश्‍वर कुमारची ट्वेन्टी-20 सामन्यातील कामगिरी बघता 74 सामन्यात 22.46 च्या सरासरीने 6.90 च्या इकॉनॉमी रेटने 78 बळी मिळवले आहेत. 2021 सालच्या त्याच्या 22.25 च्या सरासरीपेक्षा त्याची 2022 ची सरासरी 15.88 असल्याने त्याचे कमबॅक वाटत आहे. ऑस्ट्रेलियन मैदानांवर आपल्याला स्विंगपेक्षा वेग महत्त्वाचा असेल. बुमराह, मोहम्मद सिराज, दीपक चहर ही मंडळी ऑस्ट्रेलियात उपयोगी ठरतील. यापैकी सिराज आणि चहरला आशिया चषकाच्या संघात स्थान दिले नाही. मुख्य म्हणजे विश्‍व चषकासाठी ट्वेन्टी-20 संघात पंड्या, अक्सर, हुडा सारखे अष्टपैलू गरजेचे असतील तेव्हा अश्‍विनचे संघातील स्थान काय? दुसर्‍या बाजूला पाकिस्तानच्या नवोदित नसीम शाहने आपली छाप पडली आहे.

Share This News
error: Content is protected !!