काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद प्रथमच त्यांच्या मूळ निवासस्थानी जम्मूमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली असून या पक्षाचे नाव आणि झेंडा हे काश्मीरचे लोकं ठरवतील असेही आझाद यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसला रामराम केल्यानंतर प्रथमच गुलाम नबी आझाद हे आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची आज सैनिक कॉलनीत जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी नवीन राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा केली आहे.