Breaking News

दिल्लीतील ट्वीन टॉवर आज होणार जमीनदोस्त; काय आहे कारण

411 0

नवी दिल्ली:  नोएडा येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर आज रविवारी (ता.28 ऑगस्ट) रोजी दुपारी अडीच वाजता पाडण्यात येणार आहेत.

इमारतविषयक नियमावलीचे उल्लंघन करून ही जुळी टॉवर बांधण्यात आल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. त्यामुळे 40 मजल्यांच्या या दोन्ही इमारती पाडल्या जातील. या इमारती पाडण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीतील 49 वर्षीय चेतन दत्ता हे या इमारती पाडण्याचे काम देण्यात आलेल्या एडिफिस इंजिनिअरिंग कंपनीत ‘ब्लास्टर’ म्हणून नोकरीला आहेत.

कसे पाडणार ट्वीन टॉवर?

या इमारत पडण्यासाठी ९ हजार ६४० खड्डे तयार करण्यात आले आहेत. त्यात ३ हजार ७०० स्फोटकं पेरण्यात आली आहेत. योग्य वेळी बटन दाबले की नऊ सेकंदात पत्त्यांच्या घराप्रमाणे हे टॉवर कोसळणार आहेत. दुखापत आणि सुरक्षेसाठी आसपासच्या लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे टॉवर उभे करायला तेव्हा ७० कोटी खर्च आला होता पण आता या इमारती पाडण्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सुमारे तीन वर्षात तयार झालेले हे टॉवर अवघ्या ९ सेकंदात जमीनदोस्त होणार आहेत. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी ४६ जणांची टीम काम करत आहे. हे टॉवर्स पाडल्यानंतर ३० मीटर उंचीपर्यंत ढिगारा तयार होईल, अशी शक्यता आहे. तर हा ढिगारा हटवण्यासाठी सुमारे तीन महिने लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळ पसरणार असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आल्या आहेत. तर झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीनं झाकण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!