निष्ठेचं सोनं झालं! अरविंद सावंत, भास्कर जाधवांवर उध्दव ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी

366 0

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा  ढासळलेला बुरुज पुन्हा उभा करण्याचे मिशन हाती घेतले असून निष्ठावंतांवर मुख्य जबाबदारी सोपवली जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणामुळे अनेक कायदेशीर आणि घटनात्मक पेच निर्माण झाले आहेत. या सगळ्याचा गुंता सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच या घटनापीठासमोर पहिली सुनावणी होण्याची शक्यता आहे. यावेळी हे घटनापीठ कोणता अंतरिम निकाल देते, याकडे राजकीय वर्तळाचे लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!