ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

शिंदे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत त्यांनी ट्वीटरवर माहिती देत संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.

संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली व ती पॉझिटीव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. संपर्कात आलेल्यांना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मंत्री राठोड यांनी केले आहे.