पिंपरी-चिंचवडमधील एम्पायर स्क्वेअर सोसायटीतील चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला… पाहा

447 0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील अतिशय उच्चभ्रू लोकांची वसाहत समजली जाणाऱ्या एम्पायर स्क्वेअर सोसायटीत घुसून काही भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला केला.

आरव वर्मा हा मुलगा आजी-आजोबांसोबत सोसायटीच्या क्लब हाऊस समोरील मोकळ्या जागेत खेळायला गेला असताना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. एम्पायर स्क्वेअर सोसायटीत घुसून भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात आरव वर्मा हा चार वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. भटक्या कुत्र्यांनी त्याच्या अंगाला तीन ठिकाणी चावा घेतला.

या घटनेमुळं एम्पायर स्क्वेअर सोसायटीतील रहिवाशांमध्ये भटक्या कुत्र्यांविषयी दहशत निर्माण झालीये. दरम्यान, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग अक्षरशः अपयशी पडल्याचं आरोप आरवच्या आई-वडिलांनी केलाय. आमच्या सोसायटीनं वारंवार या विभागाशी पत्रव्यवहार करून देखील महापालिकेनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही, असा आरोपही त्यांनी केलाय.

एम्पायर स्क्वेअर ही पिंपरी-चिंचवड शहरातील अतिशय उच्चभ्रू लोकांची रेसिडेन्शियल सोसायटी आहे. या सोसायटीत जागोजागी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तसेच सुरक्षा रक्षक तैनात आहेत . मात्र तरी देखील भटक्या कुत्र्यांनी एम्पायर स्क्वेअर सोसायटीच्या आत शिरून एका चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केलाय. त्यामुळं या हल्ल्यावेळी सोसायटीचे सुरक्षारक्षक काय करत होते, असा सवाल आता उपस्थित होतोय.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!