पुणे: भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 नुसार काम सुरू केले आहे. भाजप पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.
मनसे नेते वसंत मोरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नवीन जबाबदारी दिली आहे.
वसंत मोरे यांच्याकडे बारामती लोकसभा मतदार संघाची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून मोरे यांच्यासोबतच रणजीत शिरोळे आणि सुधीर पाटसकर हे देखील पक्ष निरीक्षक म्हणून बारामती लोकसभा मतदार संघात काम पाहणार आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती,इंदापूर,खडकवासला इ विधानसभा मतदार संघ येतात.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पुणे ग्रामीण – मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. #MNSAdhikrut pic.twitter.com/56bRWkAAUe
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 22, 2022
वसंत मोरे यांची कार्यक्षम नगरसेवक अशी ओळख असून 2009,2012,2017 मध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिले असून त्यांच्याकडे पुणे शहर अध्यक्ष म्हणून देखील मनसेची जबाबदारी होती राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आपली भूमिका मांडल्यानंतर वसंत मोरे चर्चेत आले होते. याचवेळी त्यांचं शहराध्यक्ष पद देखील काढून घेण्यात आलं होतं मोरे हे सध्या मनसेचे राज्य सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.