खातेवाटप झालं आता बंगला वाटप! कोणत्या मंत्र्याला कोणता मिळाला बंगला

291 0

मुंबई: राज्यातील अभूतपूर्व सत्ता नाट्य नंतर अखेर 30 जूनला शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्र्यांना आज नियुक्ती झालेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात आले आहे.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांना शिवगिरी हा बंगला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पदमुक्त झाल्यानंतर संबंधित मंत्र्यांना पंधरा दिवसांच्या आत शासकीय निवासस्थान रिक्त करण्याचे आदेश देखील शासनाकडून देण्यात आले आहेत.

कोणत्या मंत्र्याला कोणता मिळाला बंगला ?

राधाकृष्ण विखे-पाटील (रॉयलस्टोन),

सुधीर मुनगंटीवार (पर्णकुटी),

चंद्रकांत पाटील (ब-१ (सिंहगड),

विजयकुमार गावीत (चित्रकुट),

गिरीश महाजन (सेवासदन),

गुलाबराव पाटील (जेतवन),

संजय राठोड ( शिवनेरी),

सुरेश खाडे (ज्ञानेश्वरी),

संदीपान भुमरे (ब-२ (रत्नसिंधु),

उदय सामंत (मुक्तागिरी),

 रवींद्र चव्हाण ( अ-६ (रायगड),

 अब्दुल सत्तार अब्दुल नबी (ब-७ (पन्हाळगड),

दीपक केसरकर (रामटेक),

अतुल सावे (अ-३ (शिवगड),

 शंभूराज देसाई (ब-४ (पावनगड) आणि

मंगल प्रभात लोढा (ब- ५ (विजयदुर्ग)

Share This News
error: Content is protected !!