पुणे: 20 ऑगस्ट 2013 सकाळ उजाडली ती एका धक्कादायक घटनेनं बरोबर नऊ वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवणारी घटना पुण्यात घडली. 20 ऑगस्ट 2013 या दिवसाची सुरुवातच अत्यंत धक्कादायक घटनेनं झाली होती.
पुण्यातल्या मध्यवस्तीतल्या, बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्याच बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
२० ऑगस्ट २०१३ या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या झाली त्यावेळी शिंदे पुलावर सफार्इ करणारा एक पुरुष आणि महिला पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी जवळच्या एका झाडावर माकड आल्याने आवाज झाला. तसेच कावळ्यांचा आवाज देखील येऊ लागल्याने या दोघांनी त्या दिशेला पाहिले. त्याच वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर दाभोलकर काही क्षणात खाली कोसळली. त्यानंतर हे हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले आणि दुचाकीवरून पळून गेले.
विरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. सचिन पुनाळेकर आणि विक्रम भावे हे पाच आरोपी या प्रकरणातले आहेत.
कट्टरतावादी लोकांना विरोध केल्याच्या कारणामुळेच डॉ. दाभोलकर यांची हत्या घडविण्यात आली, असा दावाही सीबीआयनं यात केलेला आहे. याशिवाय डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम. कलबुर्गी यांच्या हत्येचे धागेदोरे एकमेकांशी गुंतलेले असल्यानं या सर्व हत्या एका कटाचा भाग आहेत असंही केंद्रीय तपासयंत्रणेनं स्पष्ट केलं आहे.
दोन्ही साक्षीदार पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी
20 ऑगस्ट 2013 ला पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी हे दोन सफाई कर्मचारी तिथे रस्ता साफ करण्याचे काम करत होते. दाभोलकर पुलावरून चालत निघाले असताना दुचाकीवरून आलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी दाभोलकरांवर गोळीबार केला आणि ते शनिवार पेठेच्या दिशेने पळाल्याचे साक्षीदारांनी न्यायालयात सांगितले.