दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा; सिसोदिया म्हणाले…..

256 0

नवी दिल्ली: सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित 21 ठिकाणी छापेमारी केली आहे.

आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सीबीआयचे पथक घरी पोहोचल्याची माहिती सिसोदिया यांनी ट्वीट करुन दिली आहे. मी सीबीआयचे स्वागत करतो. तपासात मी पूर्ण सहकार्य करणार आहे. जेणेकरुन सत्य लवकरच बाहेर येईल असेही सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

सीबीआय घरी आली आहे. त्यांचे आम्ही स्वागत करत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचे भविष्य घडवत आहे. आपल्या देशात चांगले काम करणार्‍यांचा अशा प्रकारे छळ होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून नंबर-१ बनलेला नसल्याचे ट्वीटमध्ये सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!