आपला महाराष्ट्रब्रेकिंग न्यूज

गोंदियाजवळ भगत की कोठी रेल्वेला अपघात

गोंदिया: रायपुरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या “भगत की कोठी” ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात झाला आहे.

यावेळी समोरून जात असलेल्या मालगाडीला ‘भगत की कोठी ट्रेन’ने मागून धडक दिल्याचं वृत्त समोर येत आहे. या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला. सुत्रांच्या माहितीनुसार या ट्रेनच्या अपघातात 50 च्या वर लोक किरकोळ जखमी झाल्याचं समजत आहे.

जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान ही घटना आज पहाटे 4 वाजता घडल्याचं सांगण्यात येत आहे.