काय आहेत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघाताची कारणं ?

265 0

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर  अनियंत्रित उतार, टोकदार वळणे या त्रुटींसह यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघाताची कारणे

  • सातत्यानं पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात होत आहेत. आज या महामार्गावर झालेल्या अपघात शिवसंग्रमाचे प्रमुख विनायक मेटे यांचा मृत्यू झाला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात होण्याची विविध कारणं आहेत.

  • या महामार्गावर अनियंत्रित उतार आहे. टोकदार वळणे देखील आहे. तसेच यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. 
  • यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपघातांची संख्या व नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणे-मुंबईचा प्रवास हा अनेकांना नकोसा झाला आहे. जड वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक, रस्त्याच्या कडेला होणारे वाहनांचे अवैध पार्किंग तसेच वाटेत बंद पडणारी वाहने, घाटात वाहने चालविणारे अकुशल चालक, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे अशी अपघाताची विविध कारणे आहेत.

Share This News
error: Content is protected !!