अपघात मुक्त भारत हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली – नितीन गडकरी

260 0

मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. 

विनायक मेटे यांचं अपघाती निधन हे दुर्दैवी घटना आहे. मला खूप दुःख होत आहे. मेटे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. अनेक वेळा त्यांची आणि माझी भेट झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये विकास कामांमध्ये त्यांनी नेहमी भाग घेतलेला आहे. त्यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांचा अपघाती निधन हे महाराष्ट्रचं मोठे नुकसान असून आम्ही आपला एक चांगला मित्र गमावला असल्याची भावना गडकरींनी व्यक्त केली आहे.

अपघात मुक्त भारत हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली

रस्त्यात अपघात होतात त्यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडतात. भारतीय नागरिकांनी आता संवेदनशील बनायला हवं. या अपघाताचा नेमकं कारण मला माहीत नाही. मात्र संपूर्ण भारताला अपघात मुक्त करणे हीच विनायक मेटे यांना वाहलेली खरी श्रद्धांजली असेल, असे म्हणत गडकरींनी शोक व्यक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!