मनोरंजन क्षेत्रावर शोककळा; अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

741 0

मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धनांनी महाविद्यालयीन काळापासूनच एकांकिका स्पर्धांमध्ये केले होते. चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख कमावलेले पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकाकडे वळले. मराठी सिनेमामध्येही त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊस फूल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या मोरुची मावशी या नाटकातली पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती.

Share This News
error: Content is protected !!