ईश्वरसाक्ष शपथ घेतो की! राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार; कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी ?

203 0

राज्यात झालेल्या सत्ता संघर्षानंतर अखेर 30 जूनला राज्यामध्ये शिंदे फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.

आज सकाळी 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार असून शिंदे गटातील 9 आणि भाजपातील 9 असे 18 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

शिंदे गटातून गुलाबराव पाटील,दादा भुसे,उदय सामंत
शंभूराज देसाई,संजय शिरसाट,दीपक केसरकर,भरत गोगावले,संदीपाम भुमरे,राजेंद्र पाटील यड्रावकर मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे मात्र ऐनवेळी शिंदे गटाकडून बच्चू कडू यांना संधी मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. तर भाजपाकडून चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन,सुधीर मुनगंटीवार,नितेश राणे,जयकुमार रावल,रवींद्र चव्हाण,प्रवीण दरेकर,चंद्रशेखर बावनकुळे,आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता असून ऐनवेळी पुण्यातून माधुरी मिसाळ यांच्या नावाचा विचार होऊ शकतो तर आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गणेश नाईक यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे या दोघांबरोबरच अचानक सांगलीच्या सुरेश खाडे यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Share This News
error: Content is protected !!