उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; जगदीप धनकड की मार्गरेट अल्वा कोण मारणार बाजी?

271 0

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आज (ता.6 ऑगस्ट) मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड व विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांच्यात लढत होणार आहे. मतदान प्रक्रिया सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत संसद भवनात पार पडणार आहे.

एम व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत असून, नवे उपराष्ट्रपती ११ ऑगस्ट रोजी शपथ घेतील. विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा राजस्थानच्या माजी राज्यपाल, तर एनडीएचे उमेदवार जगदीश धनकड पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत.

या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं मार्गरेट अल्वा यांना पाठिंबा दिला असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसनं या निवडणुकीपासून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!