Crime

एफटीआयआय च्या बॉईज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली

308 0

पुणे: पुण्यातील फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ( एफटीआयआय) बॉईज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
अश्विन अनुराग शुक्ला (३२, रा, गोवा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. डेक्कन पोलीस घटनास्थळी जाऊन तपास केला.

शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक मुरलीधर करपे यांनी माहिती दिली.
करपे म्हणाले,एफटीआयआय मधील बॉयज हॉस्टेल एस १२ बी ब्लॉक रूममध्ये ही घटना घडली.शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास एफटीआयआय मधील एक रूम आतमधून बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर तत्काळ डेक्कन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी खिडकीतून पाहिल्यानंतर आतमध्ये तरुणाने गळफास घेतल्याचे दिसून आले. अग्निशामक दलाला पाचारण करून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. विद्यार्थ्याने आत्महत्या केली याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!