पुण्यातील स्वारगेट चौकात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

215 0

पुणे: पुण्यातील स्वारगेट चौकात मागील पाऊण तासापासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

स्वारगेट चौकातील देशभक्त कै केशवराव जेधे चौकात वाहतूक कोंडी झाल्याने मार्केटयार्ड,धनकवडी, कात्रज कडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला नेमकी ही वाहतूक कोंडी कशामुळे झाली याचं कारण अस्पष्ट असून प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असताना या रस्त्यावर एकही वाहतूक पोलीस नसल्याचे चित्र पहावयास मिळाले.

दरम्यान या या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेला देखील बसला असून स्वारगेट येथील नटराज हॉटेलसमोर सुमारे 15 मिनिट रुग्णवाहिका अडकली होती.

Share This News
error: Content is protected !!